खानापूर

नंदगड येथे उद्या जंगी कुस्ती मैदान

नंदगड (ता. खानापूर) लक्ष्मी यात्रेनिमित्त सोमवारी (दि. 17 फेब्रुवारी) दुपारी तीन वाजता महात्मा गांधी कॉलेजसमोरील आखाड्यात निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले आहे. डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व आंतरराष्ट्रीय मल्ल जलील इराण यांच्यात पहिल्या क्रमांकाची कुस्ती होणार आहे.

दूसरी कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व जागतिक पदक विजेता आशिष हुडा यांच्यात, तिसरी कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर व हरियाणा केसरी पवनकुमार, चौथी महान भारत केसरी माऊली जमदाडे व नॅशनल चॅम्पियन विक्रांतकुमार, पाचवी डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे व हरियाणा केसरी सुमितकुमार यांच्यात होणार आहे. या आखाड्यात देशातील नामवंत पैलवानांच्या 50 कुस्त्या होणार आहेत. स्थानिक मल्ल रोहित माचीगड विरुद्ध राज पवार सांगली यांच्यात मेंढ्याची कुस्ती होणार आहे.

महिला कुस्त्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. पहिली कुस्ती प्रांजल येळ्ळूर व राधिका मुधोळ, दुसरी शीतल खादरवाडी व ऋतुजा गणेबैल, तिसरी तनुजा खानापूर व ऋतुजा वडगाव, चौथी समीक्षा येळ्ळूर व माळअंकले, पाचवी आराध्या येळ्ळूर व मनस्वी मजगाव, सहावी भक्ती मोदेकोप व समीक्षा खानापूर, सातवी समिधा वडगाव व आदिती खोरे यांच्यात होणार आहे. रोहित धवाले नंदगड व रिधान काकतकर मजगाव यांच्यात उद्घाटनाची कुस्ती होणार आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार भालचंद्र जारकीहोळी, आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार महांतेश दोङ्गगौडर, माजी आमदार अरविंद पाटील, यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुभाष पाटील, कुस्ती कमिटीचे अध्यक्ष अशोक गोरे आदी उपस्थित राहणार आहेत.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते