खानापूर

भिमगड जंगल सफारीचा निर्णय मागे घ्या, पर्यावरणप्रेमींचा इशारा

Wildlife Safari in Bhimgad Sanctuary Sparks Environmental Concerns

खानापूर: राज्य सरकारने खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यात वन्यजीव सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पर्यावरण प्रेमींच्या तीव्र विरोधाला हा निर्णय सामोरा जात आहे. या निर्णयामुळे वन्यजीवांना धोका निर्माण होण्याची तसेच येथील नाजूक पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर माजी लष्करी अधिकारी आणि पर्यावरण प्रेमी कर्नल रवींद्र सैनी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “सात पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अनपेक्षित असून वन विभागाने याला परवानगी कशी दिली, हे धक्कादायक आहे.”

भीमगड अभयारण्य सध्या सर्वसामान्यांसाठी बंद आहे. मात्र, सफारीसाठी परवानगी दिल्यास मोठ्या प्रमाणावर पर्यटकांचा ओघ वाढेल, मानवी हस्तक्षेप वाढेल आणि पर्यावरणाचा ऱ्हास होण्याबरोबरच वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येईल, अशी भीती पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे. सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

याशिवाय, या अभयारण्यात 13 गावांमध्ये  3000 हून अधिक लोक अनेक दशकांपासून प्रतिकूल परिस्थितीत राहत आहेत. त्यांना अद्याप योग्य रस्ते, शाळा, आरोग्य सुविधा आणि मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. 2011 मध्ये केंद्र सरकारने भीमगड वनक्षेत्राला अभयारण्य म्हणून घोषित केल्यानंतर, येथे विकासकामांवर निर्बंध लादण्यात आले होते.

सरकारच्या या निर्णयामुळे जंगलात मानवी हालचाली वाढून व्यावसायिक पर्यटन वाढेल आणि यासाठी रस्ते, हॉटेल आणि इतर सुविधा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

whatsapp
whatsapp
Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते