डोंगरगाव येथे श्री गणेश जयंती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन
डोंगरगाव : येथील श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव 1 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न होणार आहे.
सकाळी 10 वाजता श्री गणेश मूर्ती अभिषेक व गण होम होईल. दुपारी 12 वाजता गावातील सुहासिनी व गणेश भक्त एकत्र येऊन पाळणा कार्यक्रम त्यानंतर आरती व तीर्थ-प्रसाद तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
संध्याकाळी 4 वाजता गावातील भजनी कलाकारांचा भजन कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 7 वाजता आरती यानंतर रात्री 9:30 वाजता चव्हाटा सोंगी व भारूडाचा विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे सादरीकरण हेब्बाळ हट्टी (ता. खानापूर) येथील भजनी भारूड मंडळ करणार आहे.
सर्व गणेश भक्तांनी या उत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गणेश जयंती उत्सव समिती, डोंगरगाव आणि सर्व गणेश भक्तांनी केले आहे.