खानापूर

कोणीही नसलेल्या कारमध्ये 1.14  करोड सापडल्याने खळबळ

उत्तर कन्नड: जिल्यातील अंकोला येथे एका निर्जन भागात उभी असलेल्या कारमुळे खळबळ माजली आहे. या कारमधून तब्बल एक कोटी चौदा लाख रुपये रोख सापडले आहेत. अज्ञात लोकांनी ही कार सोडून दिल्याचा संशय स्थानिकांना आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. सध्या पोलिस या पैशाचा स्रोत आणि मालक कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Car worth rs 1 crore found in abandoned car parked in uttar Kannada

घटनास्थळाची माहिती

उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला तालुक्यातील ही घटना आहे. सोमवारी संध्याकाळपासून राष्ट्रीय महामार्ग 63 वर रामनागूलीजवळ एक कार उभी होती. ही कार तिथे कोणी उभी केली याबाबत कोणताही साक्षीदार सापडला नाही. स्थानिकांनी चौकशी केली पण कोणताही सुगावा न मिळाल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. हायवे पेट्रोलिंग करणारे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि कारची तपासणी केली.

कारमधील मोठा सापळा

मंगळवारी पोलिसांनी कारचे दार उघडले. कारच्या आत तब्बल एक कोटी रुपये सापडले. पोलिसांनी सांगितले की कारमध्ये अन्य कोणतेही दस्तऐवज नव्हते. हायवे पेट्रोलिंग कर्मचार्‍यांनी कारसह पैसे अंकोला पोलिस स्टेशनला आणून पार्क केली आहे. सध्या पोलिस कारच्या मालकाचा शोध घेत आहेत. 

केए19 एमपी 1036 या नोंदणी क्रमांकाची कार मंगळूर येथील रहिवासी राजेश पवार यांच्या नावावर असल्याचे पोलिसांनी शोधून काढले आहे. प्राथमिक तपासात ही कार गैरव्यवहारांसाठी वापरण्यात येत असल्याचे समोर आले आहे, कारण कारमध्ये अनेक नंबर प्लेट्स सापडल्या आहेत.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या