खेळ

टी-20 विश्वचषक- सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का

नवोदित अमेरिकेने सुपर ओव्हरमध्ये माजी विजेत्या पाकिस्तानला पराभूत करत टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पहिला मोठा विजय मिळवला आहे.USA vs Pakistan

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 7 बाद 159 धावा केल्या. अमेरिकेने चांगली कामगिरी करत तीन बाद 159 धावांपर्यंत मजल मारली.T20 World Cup

सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने एक विकेट गमावून 18 धावा केल्या पण याचा पाठलाग करताना पाकिस्तानला एक बाद 13 धावा करता आल्या.

United States vs Pakistan Highlights, T20 World Cup 2024

हा निकाल 2007 च्या एकदिवसीय विश्वचषकात odi World Cup आयर्लंडकडून पाकिस्तानच्या धक्कादायक पराभवाची आठवण करून देणारा आहे.

आयर्लंड तेव्हा आपला पहिला विश्वचषक खेळत होता.

कर्णधार मोनांक पटेलने 38 चेंडूत 50 धावा केल्या, तर अँड्रीज गॉसने 26 चेंडूत 35 धावांचे योगदान दिले. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात कॅनडाविरुद्ध अमेरिकेच्या विजयाचा नायक असलेला अॅरॉन जोन्स 26 चेंडूत 36 धावांवर नाबाद राहिला.

पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 44, तर शादाब खानने 40 धावा केल्या.

अमेरिकेकडून नोस्तुश केंजिगेने सर्वाधिक 30 धावांत 3 गडी बाद केले.

अमेरिकेने कॅनडावर विजय मिळवत मोहिमेची सुरुवात केली आणि गुरुवारी झालेल्या विजयामुळे गुणतालिकेतील आपले स्थान तर उंचावलेच, शिवाय इतिहास रचण्यास ही मदत झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते