अबनाळी शाळेचे मुख्याध्यापक पी एस गुरव यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
अबनाळी: खानापूर येथील शासकीय उच्च प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रकाश शिमाणी गुरव 29 वर्षांनंतर 31 मे रोजी अध्यापन सेवेतून निवृत्त झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष प्रकाश डिगेकर होते. यावेळी व्यासपीठावर तालुका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बी एम यलूर, सीआरपी बी ए देसाई, प्राचार्य उत्तुरकर, के एच कौडाळकर, बी बी चापगावकर, जेपी पाटील एल डी पाटील, कृष्णा गुरव उपस्थित होते. रमेश कवळेकर यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले.
प्रारंभी उपस्थित पाहुण्यांनी दीपप्रज्वलन करून फोटो पूजनही केले. यावेळी एसडीएमसी व शाळेतील शिक्षकांच्या वतीने प्रतिमेचे प्रकाश शिमाणी गुरव यांचा शाल, पुष्पहार व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. टीच कॉलेजचे वर्गमित्र बी बी मुरगोड, एल डी पाटील, मोहन पाटील (कडोली), प्रकाश सुतार, निंगाप्पा कुंभार, सुरेश राऊत (शिरोली), विठ्ठल देसाई यांचा शाल, श्रीफळ आणि मित्र म्हणून भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गोपाळ हेबाळकर गुरुजी, कृष्णा गुरव, आदी मान्यवर व उपस्थित विद्यार्थ्यांची भाषणे झाली. सत्काराला उत्तर देताना श्री.प्रकाश गुरव म्हणाले की, गेली 29 वर्षे मी अबनाळी शाळेतून अध्यापन सेवेतून निवृत्त झालो. माझ्या हातातून अनेक विद्यार्थी घडवण्याचे काम माझ्या हातांनी केले याचा मला खूप आनंद आहे.
अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत याचा मला अभिमान आहे. तालुक्यातील आजी माजी शिक्षक, आजी माजी विद्यार्थी तसेच गावकर्यानी उपस्थित राहुन माझा सत्कार केला याबदल मी सर्वाचा ऋणी आहे. असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमेश कवळेकर यानी केले तर आभार विजय पाटील यानी मानले.