खानापूर

खानापूरवासीयांसाठी खुशखबर! पंढरपूर दर्शनासाठी विशेष गाड्यांची व्यवस्था

खानापूर: कार्तिक एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाने सोयीस्कर आणि अधिक सोपे झाले आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेने भाविकांची सोय लक्षात घेऊन पंढरपूरला जाण्यासाठी विशेष गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

9 नोव्हेंबर पासुन गाडी क्र. 07313  हुबळी-पंढरपूर अनरिजर्व्ह विशेष गाडी संध्याकाळी 7:45 वाजता हुबळी येथून सुटेल. तर दुसऱ्या दिवशी पहाटे 4:30 वाजता ही गाडी पंढरपूरला पोहोचेल.

तसेच, गाडी क्र. 07314 पंढरपूर- हुबळी अनरिजर्व्ह विशेष गाडी रोज सकाळी 6:00 वाजता पंढरपूर येथून सुटेल.  यामुळे पंढरपूर दर्शन आटोपून संध्याकाळी 4:30 वाजता भाविक पुन्हा खानापूर येथे पोहोचू शकतील. ही गाडी 10 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2024 दरम्यान (14 नोव्हेंबर वगळता) चालवली जाणार आहे.

या गाड्यांचे थांबे धारवाड, अळनावर, लोंढा, खानापूर, देसूर, बेळगाव, पाचापूर, गोकाक रोड, घटप्रभा, चिकोडी रोड, रायबाग, चिंचली, कुडाची, उगार खुर्द, शेडबल, विजयनगर, मिरज, सुळगे, कवठे महांकाळ, ढालगाव, जात रोड आणि सांगोला येथे असणार आहेत.

या गाड्यांमध्ये एकूण 12 डब्बे असतील, ज्यात 10 सामान्य दुसऱ्या श्रेणीचे डब्बे आणि दोन सामान-लगेज-कम-ब्रेक व्हॅन असतील. खानापूरमधील भाविकांना कार्तिक एकदशी निमित्त विठुरायाला भेटण्याची ही एक विशेष संधी आहे.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते