खानापूर

परतीच्या पावसानंतर थंडीचे आगमन; खानापूरचे तापमान घसरले

खानापूर : हवामानातील बदलासह खानापूर तालुक्यातील शहर आणि ग्रामीण भागात थंडीची चाहूल लागू लागली आहे. तापमानात घट होत असून, शनिवारी सकाळी अंदाजे 14.4 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली उतरले होते.

ग्रामीण भागात भात कापणी आणि मळणीची कामे जोरात सुरू असून, शेतकरी थंडीच्या वातावरणात सक्रीय दिसत आहेत.

गेल्या ऑक्टोबरपर्यंत चाललेला पावसाळा काही दिवसांपूर्वीच थांबला असून, परतीच्या पावसाचा प्रभाव कमी झाल्याने थंडीचा मोसम सुरू झाला आहे. पहाटेपासून सकाळपर्यंत आणि सायंकाळनंतर वातावरणात गारवा जाणवू लागल्याने नागरिकांनी स्वेटर, गरम जॅकेट, कानटोप्या, शाल, मफलर यांसारखे उबदार कपडे बाहेर काढले आहेत.

गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमान सातत्याने घटत असून, कमाल तापमान 29.6 अंश सेल्सिअसपर्यंत आले आहे. दिवसभर ऊन असले तरी ऑक्टोबरमध्ये जाणवणारी उष्णता आता कमी झाली आहे. पहाटे थंडीची तीव्रता वाढल्याने, सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांमध्ये कानटोप्या आणि उबदार कपड्यांचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे.

खानापूरचे कमाल तापमान सध्या अंदाजे 26.6 अंश सेल्सिअसपर्यंत स्थिर असले, तरी गेल्या दोन तीन दिवसांपासुन तापमान घटत चालले आहे.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते