खानापूर

लोंढा-पाटये येथील पाचवीत शिकणाऱ्या मुलाचा तिस्क गोवा येथे नाल्यात बुडून मृत्यू

खानापूर: तिस्क-उसगाव येथील साईनगर जवळील खाडीत पाचवीत शिकणाऱ्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. नाल्याच्या पाण्यात बुडून कु. दर्शन संतोष नार्वेकर (वय 11) मूळ गाव खानापूर तालुक्यातील पाटये या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. Darshan Santosh Narvekar

मिळालेल्या माहितीनुसार, हा मुलगा अवंतीनगर, उसगाव येथून सायंकाळी सातच्या सुमारास इतर चार ते पाच विद्यार्थ्यांसह ट्युशनवरून घरी परतत होता. परतत असताना पाण्याची पातळी कमी असताना तो नाला पार करत असताना पाण्याची पातळी वाढली आणि तो वाहून गेला. मुलांनी त्याची बॅग पकडून  त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण तो वाहून गेला.

फोंडा येथील अग्निशमन व आपत्कालीन सेवेच्या जवानांनी काल बचाव कार्य सुरू केले होते. आज 17 रोजी दुपारी 12.30 वाजता ओहोळ व खांडेपार नदीच्या संगमावर त्याचा मृतदेह सापडला आहे.

A boy studying in Standard 5 was feared drowned in a creek near Sainagar in Tisk-Usgao on Wednesday evening.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या