खानापूर

खानापूर: कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या, या गावातील घटना

खानापूर: हाळ झुंजवाड गावातील एका कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना आज सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी घडली आहे. बाळू निंगाप्पा गोसेनट्टी (वय 51) असे शेतकऱ्याचे नाव आहे.

या शेतकऱ्याने मायक्रो फायनान्ससह विविध बँकांकडून सुमारे सहा लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मायक्रो फायनान्समधून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी धडपडत असल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

या शेतकऱ्याच्या नावावर केवळ 28 गुंठे जमीन आहे. त्यांनी मायक्रो फायनान्स चैतन्यकडून 50000, नवा चैतन्यकडून 70000, ग्रामशक्तीकडून 50 हजार, बीएसएफ फायनान्सकडून 1 लाख, बंधन फायनान्सकडून 1,60हजार, कर्नाटक रुरल डेव्हलपमेंट बँक बिडी शाखेतून 50 हजार, धर्मस्थळ संघाकडून 30000 असे एकूण 6 लाख घेतले होते. उत्पन्नापेक्षा कर्ज अधिक असल्याने त्याची परतफेड वेळेत करणे शक्य असल्याने संबंधित शेतकरी मानसिक तणावाखाली होता.

सदर फायनान्सकडून वेळोवेळी रक्कम देण्यास अडचणी येत असल्याने शेतकऱ्याने शेतात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, असा परिवार आहे. सदर आत्महत्या प्रकरणाचा तपास नगरचे पोलीस निरीक्षक सीएस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाच्या पोलीस उपनिरीक्षक सपाटे यांनी केला आहे. दुपारनंतर सदर शेतकऱ्याचा मृतदेह खानापूर येथे सर्व विच्छेदनासाठी पाठवण्यात आला व त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. पोलीस याचा पुढील तपास करत आहे.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते