खानापूर

जांबोटी गावामध्ये श्री दुर्गादेवी आगमन सोहळा व दौडचा पहिला दिवस उत्साहात

खानापूर: काल जांबोटी येथे दौडची सुरवात मोठया उत्साहात झाली.  जांबोटी आऊट पोस्ट पोलीस स्टेशन चे ASI व नागेश पाटील व विठ्ठल वेताळ (माजी बँक मॅनेजर ) यांच्या हस्ते दूध शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक घालून दौडला सुरवात करण्यात आली. दौड शिवस्मारक बस स्टॅन्ड,गांधी नगर,पारवडकर गल्ली, राम मंदिर, पंचांची खुंट्टी व शेवटी शिवस्मारक  बस स्टॅन्ड वर समाप्त झाली.

दौडचे अध्यक्ष, श्री.मंजुनाथ मुतगी, उपाध्यक्ष कु.मिथुन कुंभार, मार्गदर्शक – श्री. मनोहर गोवेकर, श्री. सचिन कुडतूडकर,श्री. राजू कुर्लेकर, श्री. मारुती हळब, कु. मदन कुडतरकर, कु. दत्ता पारवडकर,कु.आनंद सुतार,श्री. संजय गावडे, श्री. राजू गावडे, श्री. संजय कनगुटकर, श्री. सुशांत डांगे, कु. अमोल जांबोटकर, श्री. मयूर राजापूरकर, श्री. सतीश कुंभार, श्री. सचिन पेडणेकर, श्री. समीर नेवगिरे, श्री. किरण कोलीकर, श्री. मंजुनाथ कुडतूरकर, श्री. उमेश हळदणकर, कु. रवींद्र हळदणकर व गावकरी या सर्वांचा सहभाग होता.


संध्याकाळी दुर्गादेवीचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते