गावोगावी दुर्गामाता दौडला उत्साहात सुरूवात
खानापूर: देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षी घटस्थापना ते दसरा दरम्यान दुर्गामाता दौडचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते. या दुर्गामाता दौडला आज दि. 3 ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला आहे. शहरासह खेड्यातही दौडची व्यापकता वाढली असून अनेक धारकरी या दौडमध्ये भाग घेताना दिसत आहेत. खानापूर शहरासह तालुक्याच्या विविध भागांमध्ये या दुर्गादेवीचे आयोजन गुरुवारी करण्यात आले पुढील दहा दिवस म्हणजे 12 ऑक्टोबर पर्यंत दौड दररोज विविध मार्गावरून धावणार आहे.
खानापूर शहरात या दौडचा प्रारंभ आज सकाळी शिवस्मारक चौकातून करण्यात आला. राजा शिवछत्रपती ना अभिवादन झाल्यानंतर सदर दुर्गा दौड नीगापूर गल्ली, लक्ष्मी मंदिर, चिरमुरकर गल्ली, कडोलकर गल्ली, चौरासी मंदिर,
,दादोबा नगर संभाजी महाराज स्मारक,घाडी गल्ली,
गुरव गल्ली, बस्ती गल्ली, सातेरी माऊली मंदिर या ठिकाणी येऊन समाप्ती झाली.
या दुर्गादौडीत अबाल वृद्धा सह युवती महिलांनी मंडळींनी मोठ्या हिरीरीने भाग घेतला होता.
उद्या शुक्रवारचा मार्ग, उद्या शुक्रवारी खानापूर शहरातील दुर्गादौडीचा मार्ग असा राहणार आहे. सकाळी शिवस्मारक चौकापासून नित्याप्रमाणे सुरुवात होऊन मिशन कंपाउंड, मारुती मंदिर स्टेशन रोड, मन्सापुर जुना रोड, खानापूर. श्री रामलिंग मंदिर, असोगा या ठिकाणी समाप्त होणार आहे.