खानापूर

हलशी जवळील अपघातात माजी आमदार अरविंद पाटील यांच्या चालकाचे निधन

खानापूर:  शनिवारी दुचाकीवरून नंदगड हून मेरडा गावाकडे जात असताना हलशी जवळ गाडी मोठ्या खड्ड्यात गेल्याने  माजी आमदार अरविंद पाटील यांचा वाहन चालक संतोष मादार वय 46 हा गंभीर जखमी झाला होता त्याला उपचारासाठी के एल इ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास मृत्यू झाला. त्याच्यावर आज मंगळवारी सकाळी 11 वाजता मेरडा मुक्कामी अंत्यसंस्कार होणार आहे.

संतोष याचे जाणे हे मनाला चटका देणारे आहे. खानापूर तालुक्यात कोणत्याही ठिकाणी कधीही अपघात झाला तरी तातडीने धाव घेऊन त्याच्यावर उपचार केले पण स्वतःचाच वाहन चालक जेव्हा अपघातात जखमी झाला. तेव्हा दुर्दैवाने आपण या ठिकाणी नव्हतो. कदाचित या ठिकाणी आपण असतो तर हा प्रसंग घडलाच नसता, पण संतोष यांचे दुर्दैवी म्हणावे लागेल. झालेल्या या अपघातामुळे अतिव दुःख झाले आहे. एक सच्चा व प्रामाणिक चालक नव्हे तर मित्र हरवल्याची खंत माजी आमदार अरविंद पाटील यांनी व्यक्त केली आहे.

खानापूर तालुक्यात अनेक रस्ते हे जीव घेणे ठरले आहेत. संतोष मादार यांचा बळी या रस्त्याने घेतला असून, अजून किती अपघातांची वाट संबधीत खाते बघत आहे असा सवाल जनता करत आहे.

त्याच्या पश्चात वडील, पत्नी मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते