स्थलांतर बैठकीत सर्वपक्षिय ठराव, हे मान्य असल्यास स्थलांतर
सरकारनं योग्य मोबदला आणि योग्य पुनर्वसन केल्यास आम्ही स्थलांतरासाठी तयार
खानापूर: तालुक्यातील भिमगड अभयारन्य क्षेत्रात येणाऱ्या नऊ गावा पैकी पाच गावे स्थलांतरीत होण्यासाठी तयार झाली आहेत. आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज खानापूर येथे भीमगड अभयारण्य क्षेत्रातील ग्रामस्थासह तालुक्यातील सर्वपक्षीय बैठक पार पडली.
या बैठकीत भीमगड अभयारण्य क्षेत्रात येणारी गवाळी, कोंगळा, तळेवाडी, आमगाव,पास्टोली ही गावे स्थलांतर होण्यास तयार झाली आहेत काही मतभेद असले तरी सरकारने योग्य मोबदला तालुक्याच्या योग्य ठिकाणी पुनर्वसन केले तर आपण स्थलांतर होण्यास तयार आहोत अशी भूमिका त्यांनी घेतली जमिनीच्या मोबदल्यात जमिनी किंवा योग्य मोबदला सर्व सरकारी सुविधा आणि प्रत्येक माणसाला पंधरा लाख रुपये दिल्यास आम्ही स्थलांतर होण्यास मान्य असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.
गवाळी येथिल नागरिकांनी आम्हाला कोणत्याही परिस्थितीत स्थलांतरित व्हायचे आहे असेही सांगीतले.
या बैठकीत हजर असलेल्या सर्व पक्षीय नेत्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी काही ठराव मांडण्यात आले.
- त्याचं पंचायत हद्दीत स्थलांतर
- प्रत्येकी 15 लाख
- गेलेली जमीन किंवा जमिनीचा मोबदला
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले पुढील कार्यवाही करण्यासाठी सर्वपक्षिय कमिटी तयार करण्यात येईल व सबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तुमच्या सर्वांच्या भल्यासाठी योग्य निर्णय घेतला जाईल. यावेळी आज मान्य झालेले ठराव वनखात्याला पाठवले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आजच्या सर्व पक्ष बैठकीत भाजप काँग्रेस, आप, जनता दल ,महाराष्ट्र एकीकरण समिती विविध संघटना आजी-माजी आमदार जिल्हा तालुका आणि ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.