खानापूर

खानापूर तालुक्यातील या 61 गावांचे स्थलांतर, केंद्र सरकारकडून संवेदनशील गावांची यादी


नवीदिल्ली: खानापूर तालुक्यातील 61  गावे आणि बेळगाव तालुक्यातील 1 गाव पर्यावरणदृष्ट्या घातक (जिथे पावसाच्या पाण्याचा आणि दरड कोसळण्याचा धोका) पट्ट्यात येत असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.

तशा आशयाची पाचवी मसुदा अधिसूचना केंद्राने जारी केली असून, गावांचे स्थलांतर करावे लागण्याची शक्यता आहे.

केरळमधील वायनाड भूस्खलनाच्या दुर्घटनेनंतर गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ या पाच राज्यांतील पश्चिम घाटाचा सुमारे 56 हजार चौरस किलोमीटर प्रदेश संवेदनशील घोषित करण्यात आला आहे.


संवेदनशील पट्ट्यात बेळगाव तालुक्यातील धामणे एस. हे एकमेव गाव आहे, तर खानापूर तालुक्यातील 61 गावे आहेत. त्यात जांबोटी हे मोठे गावही आहे. ही मसुदा अधिसूचना शुक्रवारी जारी करण्यात आली. त्यावर 60 दिवसांत सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत.

2011 मध्ये हा मुद्दा समोर आल्यापासून पश्चिम घाटाशी  संबंधित महाराष्ट्र, तामिळनाडू, गोवा, केरळ, कर्नाटक आणि गुजरात या सहा राज्यांमध्ये एकमत होण्यासाठी सरकार स प्रयत्नशील आहे.

संवेदनशील पट्टयात येणाऱ्या गावांची नावे

खानापूर तालुका : बैलूर, चिगुळे, बेटगेरी, मोरब, हुळंद, कणकुंबी, गोल्याळी, उचवडे, चोर्ला, बेटणे, जांबोटी, कालमणी, पारवाड, गवसे, चापोली, चिखले, दारोळी, कापोली, मुगवडे, आमगाव, कबनाळी, अल्लोळी, कान्सुली, कवळे, गवाळी, नेरसे, पास्तोली, कोंगळा, मणतुर्गा, खानापूर ग्रामीण, होल्डा, तेरगाळी, जामगाव, अबनाळी, शिरोळी, केळील, डोंगरगाव, मेंडील, देगाव, पडलवाडी, हेम्माडगा, आंबेवाडी, कामतगा, किरवळे के. जी., वरखडपाटे, घोसे, मोहिशेत, घोटगाळी, शिंदोळी बी. के., सातनाळी, आकराळी, बस्तवाड, कोडगई, सुळेगाली, मुंदवाड, नागरगाळी, तारवाड, चिंचेवाडी, सुवातवाडी, कुंभार्डा,

बेळगाव तालुका : धामणे एस.

मसुद्याच्या अधिसूचनेनुसार, पश्चिम घाट पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले जाणार आहे.

पुढील अपडेट साठी ग्रूप जॉईन करा👇

source: pudhari

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या