खेळ

देश आयपीएल मध्ये व्यस्त असताना “आयर्लंडने पाकिस्तान ला गंडवले”

वर्ड कप आधी सुरु असलेलेल्या ऐतिहासिक टी-20 सामन्यात आयर्लंडने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. आयर्लंड संघाकडून क्रेग यंगने गोलंदाजीत चमक दाखवली, तर धावांचा पाठलाग करताना बलबर्नीच्या आक्रमक खेळीने विजय मिळवला.

आयर्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये तीन सामन्याची टी-20 मालिका डब्लिनमधील क्लोनटार्फ क्रिकेट क्लब येथे सुरु आहे. आयर्लंडविरुद्धच्या पराभवामुळे पाकिस्तान तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे. आयर्लंड संघाने बाबर आझमच्या पाकिस्तान संघावर 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवत पाकिस्तानवर पहिला टी-20 विजय मिळवला.

विशेष म्हणजे आयर्लंडने याआधी 2007 च्या 50 षटकांच्या विश्वचषकात पाकिस्तानला केवळ एकदाच पराभूत केले होते. 2 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी आहे. विशेष म्हणजे पुढील महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या साखळी फेरीतही हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.

आयर्लंडचा पाकिस्तानवर विक्रमी विजय :

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 182 धावा केल्या होत्या, सलामीवीर सईम अय्युब याने (29 चेंडूत 45 धावा) आणि कर्णधार बाबर आझम याने (43 चेंडूत 57 धावा) केल्या. दरम्यान, आयर्लंडचा वेगवान गोलंदाज क्रेग यंगने बाबर आझम आणि आझम खान यांच्या एका षटकातचं दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेत पाकिस्तानच्या मधल्या फळीला दडपणाखाली आणले.

आयर्लंडची देखील फलंदाजीत चांगली सुरुवात झाली नाही . आयर्लंडने 4 षटकांपेक्षा कमी वेळात आपले पहिले दोन गडी गमावले. त्यानंतर अँड्र्यू बालबर्नी आणि हॅरी टेक्टर यांनी 75 धावांची संयमी फलंदाजी करत संघाला 100 धावांचा टप्पा ओलांडून दिला.

त्यानंतर बलबर्नीने प्रति आक्रमक खेळी (55 चेंडूत 77 धावा) खेळत संघाला लक्ष्याच्या जवळ नेले आणि सामन्याच्या 19 व्या षटकात शाहीन शाह आफ्रिदीने त्याला बाद केले. शेवटी कर्टिस काम्फरने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर लेग बाय घेत आपल्या संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला.

आयर्लंडच्या पाकिस्तानवरील विक्रमी विजयावर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया:

शुक्रवारी आयर्लंडविरुद्ध पाकिस्तानच्या पराभवानंतर एका युजरने लिहिले की, “1932 पासून माझे आजोबा क्रिकेट पाहत आहेत आणि ते म्हणतात की हा इतिहासातील सर्वात वाईट पाकिस्तान संघ आहे. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता आणि ते जवळजवळ 100 वर्षांचे आहेत.”

आयर्लंड आणि नेदरलँड्ससारख्या संघांनी खेळलेल्या मर्यादित सामन्यांबद्दल आयसीसीला प्रश्न विचारला असता त्यांनी लिहिले, “आयर्लंड आणि नेदरलँड्ससारख्या संघांना आपण मुख्य प्रवाहातील क्रिकेटचा भाग बनवले पाहिजे असे आपल्याला वाटत नाही का? अनेक दशके उलटून गेली आणि अजूनही काही संघ मुख्य कॅलेंडरमध्ये खेळतात.

पाकिस्तान क्रिकेट संघाचे कर्णधारपद शाहीन शाह आफ्रिदीकडे परत देण्याची वेळ आली आहे का, असा प्रश्न आणखी एका युजरने उपस्थित केला आहे.

विशेष म्हणजे बाबर आझमने अलीकडेच शाहीन शाह आफ्रिदीकडून पाकिस्तान संघाचे कर्णधारपद परत घेतले होते. दरम्यान, शान मसूद लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते