खानापूर

खानापूर तालुक्यातील 14 गावांचे स्थलांतर; बंगळुरूमध्ये महत्त्वाची बैठक

खानापूर: पश्चिम घाट परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील वनसीमाभागातील गावातील नागरिकांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर परिषदेचे सदस्य नागराज यादव यांनी या समस्या सोडविण्यासाठी पावले उचलली आहेत.

खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी या भागातील जनतेच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. तसेच आमदारांनी वनमंत्री ईश्वर खंड्रे यांना समस्या सांगून महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

बेंगळुरू येथे ईश्वर खंड्रे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी, परिषद सदस्य नागराज यादव, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यासह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी खानापूर तालुक्यातील आमगाव येथील एका आजारी महिलेला खाटेवर बसवून 6 किलोमीटर पर्यंत नेण्यात आले होते. 

हा अहवाल आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर परिषदेचे सदस्य नागराज यादव यांनी या समस्येकडे यशस्वीपणे मंत्र्यांचे लक्ष वेधले. पेपर नुसार होलडा, पास्टोली, चिकले, देगांव, गवाळी,तळेवाडी, कृष्णापूर, जामगांव, कोंगळा, अबनाळी, हेम्मडगा, पाली, मेंडील, आमगांव या 14 वनसीमेवरील गावांतील लोकांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना कराव्यात आणि त्यांचे स्थलांतर करावे, अशी मागणी यादव यांनी मंत्री ईश्वर खांद्रे यांच्याकडे केली.

मंत्री ईश्वर खांद्रे यांनी यादव यांच्या चिंतेला सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. तसेच पुनर्वसनासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवावे, अशी विनंती त्यांनी प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे केली. मंत्री सतीश जारकीहोळी यांनीही यादव यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.

PROBLEMS OF FOREST BORDER VILLAGES IN BELAGAVI; IMPORTANT MEETING IN BENGALURU

Karnataka goa border village problems

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते