नोकरी

अंगणवाड्यांमध्ये नवीन भरती, 10 दिवसांत गृहलक्ष्मीचे पैसे जमा होणार

बेंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या हमी योजनांपैकी एक असलेल्या गृहलक्ष्मी योजनेची Gruha Lakshmi Scheme रक्कम दहा दिवसांत खात्यात जमा करण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

लक्ष्मी हेब्बाळकर Laxmi Hebbalkar यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मे महिन्यात आम्ही खात्यात पैसे जमा केले होते. पण तांत्रिक बिघाडामुळे जून व जुलै महिन्याचे पैसे येण्यासाठी वेळ झाला. डीबीटीची तांत्रिक कामे सुरू आहेत. आठ ते दहा दिवसांत खात्यात पैसे जमा होतील, असे त्यांनी सांगितले.

Gruha Lakshmi yojna Karnataka

अंगणवाडी शिक्षिकांना लवकरच मानधनवाढ आणि नवीन भरती: मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

अंगणवाडी शिक्षिका आणि साहायिकांच्या मानधनात वाढीचा प्रस्ताव सरकारपुढे आहे. याविषयी लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती महिला आणि बालविकासमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. त्या बुधवारी (दि. 22) विधान परिषदेत भाजप सदस्या भागीरथी मुरळ्या यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, अंगणवाड्यांच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. अशावेळी शिक्षिका आणि साहायिकांचाही सकारात्मकतेने विचार केला जाणार आहे.

अंगणवाड्यांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. ती भरण्यासाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 2017 मध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शिक्षिका आणि साहायिकांच्या मानधनात वाढ केली होती. त्यानंतर त्यांना वेतनवाढ मिळाली नव्हती. आता पुन्हा एकदा काँग्रेस सरकारच्या काळात त्यांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव आला आहे. अंगणवाड्या चालवण्यात येणाऱ्या इमारतींसाठी भाडेवाढ देखील करण्यात येणार आहे.

Anganwadi teachers to get salary hike and new recruitment soon: Minister Laxmi Hebbalkar

Laxmi Hebbalkar

Karnataka Anganwadi bharati 2024

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या