खानापूर

खानापूर मारुतीनगर चोरीतील चोरांना पकडण्यात यश:  10 तोळे सोने, 16 तोळे चांदी जप्त

खानापूर: महिन्या भरापूर्वी खानापुर मारुती नगर येथे सुभेदार बसवंत निलजकर यांच्या घराचा लॉक तोडून 10 तोळे सोने आणि चांदी चोरी झाल्याची घटना घडली होती. या घटनेतील चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

हुबळी पोलिसांच्या मदतीने खानापूर पोलिसांनी चोरीच्या साखळी प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या दोघांना गजाआड केले. त्यांच्याकडून दहा तोळे सोन्याचे दागिने आणि १६ तोळे चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात
आला.

दीपक नागेंद्र मातंगी (वय 28, रा. हलकर्णी ता. खानापूर) आणि शिवनागय्या मुत्याप्पा उमचगीमठ (वय 26, रा. हुंचेनहट्टी ता. बेळगाव) अशी संशयितांची नावे आहेत. या दोघांनी मारुतीनगर आणि रुमेवाडी क्रॉसवर घरफोडी केली होती.


चौकशी दरम्यान चोरांनी खानापूरमध्येही घरफोडीचीही कबुली दिली. खानापूर पोलिसांनी न्यायालयातून त्यांना पोलिस कोठडीत देण्याची मागणी केली होती. ती मंजूर झाल्यानंतर गुरुवारी त्यांना खानापुरात आणून चोरी केलेल्या घरांची ओळख पटवली.

khanapur police case

khanapur news today

Belgaum news Today

todays news in khanapur

khanapur varta

khanapur news paper today

news source: pudhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या