चोर्ला घाटात पर्यटकांची गर्दी, दारुड्याचा भर रस्त्यात नाच
बेळगाव : पश्चिम घाटात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक धबधबे जिवंत झाले असून धुक्याने आच्छादलेले कणकुंबी गाव आणि चोर्ला घाट डोंगर-दऱ्यांच्या सौंदर्यात पर्यटकांची गर्दी वाढत आहे.
बेंगळुरूहून आलेला पर्यटक धनुष म्हणाला, ‘आम्ही पहिल्यांदाच इथे आलो आहोत. कोडगू आणि कोडाचद्रीसारख्या ठिकाणी आपल्याला अधिक धुके पाहायला मिळतात. पण त्यापेक्षा सुंदर नजारा येथे एन्जॉय करत आहोत आणि भरपूर पाऊस आहे आणि लोक या दृश्याचा आनंद घेत आहेत.
मद्यधुंद पर्यटकाचा रस्त्याच्या मधोमध नाच
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका पर्यटकाने रस्त्याच्या मधोमध नाच मुसळधार पावसात वाहतूक रोखून धरल्याचे दृश्य रविवारी निर्माण झाले. हा तरुण स्वतःच्या जीव धोक्यात घालून रस्त्यावर लोटांगण घालत होता. विशेष म्हणजे त्याचे मित्र या प्रकारचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रण करत त्याला प्रतिसाद देऊन खतपाणी घालत असल्याने वाहनांना वाट काढणे कठीण झाले होते. वाहनधारकांनी बरीच समजूत काढल्यानंतर मद्यधुंद पर्यटक पावसात नाचत नाचत वाहनांसाठी मार्ग मोकळा केला.
पोलिसांनी गस्त घालून असे प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
#chorlaghat #kankumbi #jamboti #khanapur