बातम्या

विरोधकांच्या निरर्थक टीका, माझे प्राधान्य विकास : डॉ.अंजली निंबाळकर

कारवार लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर या यापूर्वी खानापूर मधून आमदार होत्या. मार्गारेट अल्वा यांच्यानंतर लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला उमेदवार आहेत. त्यांच्या या उमेदवारी, प्रचार, आणि विकास या मुद्यांवर तुमच्या आमच्या मनातील काही प्रश्न आणि अंजली निंबाळकर यांचे उत्तर…

मतदारांनी तुम्हाला का मतदान करावे?

उत्तर कन्नड मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी अहोरात्र काम करणार आहे. जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्नांसाठी संसदेत आवाज उठवण्यासाठी मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रचाराचा आराखडा कसा आहे? सर्व काही अपेक्षेप्रमाणे चालले आहे का?

आर.व्ही.देशपांडे, सतीश जारकीहोळी, मनकला वैद्य, आमदार भीमण्णा नाईक, सतीश सैल, बाबासाहेब पाटील, माजी आमदार शारदा शेट्टी, विवेक हेब्बर, व्ही. एस. पाटील, नेते निवेदित अल्वा, हे सर्व जण माझ्या विजयासाठी एकजुटीने काम करत आहेत. लोक अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद देत आहेत आणि यावेळी आम्ही 100 टक्के जिंकणार आहोत.

राजकारणातील माझ्या प्रदीर्घ अनुभवात सध्याची निवडणूक कशी वाटते?

या क्षेत्रातील बहुसंख्य जनता माझ्या पाठीशी आहे. विकासासाठी निवडणुका होत असून विकासासाठी जनता मला मतदान नक्की करेल. मी एकदा आमदार म्हणून जनतेच्या समस्या अनुभवल्या आहेत. आणि त्या 100% माझे प्रयत्न करून पूर्ण केल्या आहेत. मी आतापर्यंत काँग्रेस पक्षात अनेक पदांवर काम केले आहे. जनतेच्या रोजच्या जीवनातील समस्या सोडविण्याचा आणि जनतेला शांततेत जगविण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रयत्न आहे, तर भाजप फक्त धर्म, जातीय राजकारण व इतर कारणांच्या आधारे निवडणूक लढवत आहे. आम्ही दिलेल्या हमी योजनेमुळे जनता खूश आहे. आणि यापुढे अधिक चांगल्या योजना मिळवीण्यासाठी जनता मला नक्की मतदान करेल.

अजून या क्षेत्राचा विकास व्हायचा आहे?

या भागातील गावोगावी, शेतात फिरताना अनेक समस्या लक्षात आल्या आहेत. बेरोजगारीची समस्या अधिक असून त्यावर मात करण्यासाठी पर्यावरणपूरक उद्योग आणि पर्यटन क्षेत्राचा विकास करण्याची गरज आहे. रुग्णालयाबाबत लोक आवाज उठवत आहेत. त्यामुळे अजून मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची गरज आहे.

निवडणूक जिंकली तर तुमची पहिली प्राथमिकता काय असेल?

मला निवडणूक जिंकण्यावर पूर्ण विश्वास आहे. जर मी जिंकले तर माझे पहिले प्राधान्य रुग्णालय बांधण्याला असेल. तसेच भागातील लोकांच्या मुलभूत गरजा जसे कि पूर्ण करण्याचे असेल. लोकांचे प्राण वाचवण्याचे काम केले तर सगळे बरे होतील. एक डॉक्टर म्हणून मी अहोरात्र काम करून हॉस्पिटल उभारण्याचा प्रयत्न करीन. अतिक्रमण धारकांसाठी मी लढा देईन.शेतकऱ्यांना आशिक सुविधा, कुणबी समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.

सर्वच पक्षांमध्ये असंतोष असणे स्वाभाविक आहे. पक्षांतर्गत नाराज इच्छुकांना शांत कसे करणार? काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे. प्रत्येकाला येथे तिकीट मागण्याची संधी आहे. तिकीट मागण्यासाठी ते शेवटचा पर्याय निवडतात. इतर पक्षांमध्येही असेच घडते. त्यात असंतोष, नाराजी, नाराजी असे काहीच नसते. ज्यांना तिकीट हवे होते, ते सर्व जण जिंकण्यासाठी माझ्यासोबत काम करत आहेत.

जिल्ह्यात नवीन, तुम्ही याला कसे सामोरे जाल?

विरोधकांची निरर्थक टीका…

डॉ. अंजली निंबाळकर

मी खानापूर मतदारसंघाचा माजी आमदार असून खानापूर हा उत्तर कन्नड मतदार संघात येणारा तालुका आहे. मी मतदार संघातील खानापूर तालुक्यातील असून देखील मला बाहेरची म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे पण ते यात अपयशी ठरले आहेत. उत्तर कन्नड जिल्ह्यातील जनता माझ्याकडे त्यांच्या घरातील मुलीप्रमाणे पाहत आहे. अशा प्रकारे विरोध करणाऱ्या भाजपने खानापूरला येऊन मते मागायला येऊ नयेत का?  त्यांनी मतदान केले नसते तर इतकी वर्षे भाजप जिंकली असती का? असे प्रश्न त्यांनी निर्माण केले. व या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते