खानापूर

पंचेचाळीस चुलिंचा एक घरगुती गणपती

खानापूर: दिवसेंदिवस अनेक मोठी कुटुंब लहान होताना दिसतात. नवीन घर बांधलं की स्वतःचा गणपती बसवतात भाऊ भाऊ विभक्त होतात. पण या सर्वांसाठी सर्वोत्तम उदाहरण म्हणजे कापोली गावातील देसाई कुटुंबीय.  गेल्या 79 वर्षांपासून पंचेचाळीस देसाई चुली मिळून एक घरगुती गणपती बसवतात.

सालाबाद प्रमाणे मौजे कापोली केजी तालुका खानापूर या ठिकाणी सुरगौंडा गल्ली (मधली गल्ली) याठिकाणी देसाई कुटुंबातर्फे जवळपास 75 वर्षा होऊनही अधिक काळाची परंपरा जपत वडीलधारी व्यक्तींच्या सांगण्याप्रमाणे 79 व्या वर्षी अत्यंत उत्साहाने व एकरूपतेने जवळपास 45 कुटुंबे एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा  करतात.   गौरी विसर्जन च्या मुहूर्तावर गणपती बाप्पांचे अत्यंत भाऊकतेने विसर्जन  करतात.

स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळकांनी आपल्या भारतीयांमध्ये एकजूट व्हावी व राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी या उद्देशाने हा उत्सव सुरू केला. आपल्या देसाई कुटुंबातर्फे केला जाणारा उत्सवही जवळपास स्वातंत्र्यपूर्व काळापासून अखंडितपणे  आहे. एकंदरीतपणे हा उत्सव आपल्या अभेद्द एकीचे दर्शन घडवितो. खऱ्या अर्थाने ही तर आपल्या  पूर्वजांची पुण्याई ज्यानी भूतकाळामध्येच आपल्या भावी पिढीची भविष्यकाळातील एकतेची दावन बांधून ठेवली. सालाबाद प्रमाणे या वर्षीही उत्सवाच्या पूर्वतयारी पासून ते विसर्जन पर्यंत आपल्या घराण्यातील नव उमेदीने वारसा स्वतःच्या खांद्यावर घेणारे सर्व तरुण युवक इतिहास काळातील दृष्टांत कथन करणारी वडीलधारी माणसे, कार्यक्रमाला शोभा वाढविणाऱ्या व शांततेची शिकवण देणाऱ्या माय भगिनी महिला मंडळ आणि पहिल्या पावसाच्या आगमनाने थुई थुई नाचणाऱ्या मोराप्रमाणे हे सहा दिवस आपल्या मंदिरामध्ये किलबिलाट करणारे आणि सजावटी साठी लावलेले फुगे मौज म्हणून फोडणारे बालचमू यांच्या विविध अशा विचारसरणीचे आणि कार्यकरणीचे एकरूप होऊन आनंद व्यक्त करण्याचा जनू इंद्रधनुष्यच भासतो हे एक वैशिष्ट्यच आहे. गणपती बाप्पाचे आगमन आणि पर गावाहून गावाकडे येणाऱ्यांच्या आगमनामुळे गावातील वातावरण आनंदाने द्विगुणीत होते यात काहीच शंका नाही. सालाबाद प्रमाणे यंदाही उत्सवाच्या पूर्वतयारी पासून विसर्जनापर्यंत अत्यंत उत्साहाने आणि एकरूपतेने यावर्षी संपूर्ण उत्सव पार  पडला. सुंदर अशी सजावट व लाइटिंग करण्यात आली. एकंदरीत सहा दिवसात विविध स्वरात जवळपास एकेक तास तबला पेटी आणि टाळांच्या सुरात आरत्या म्हणण्यात आल्या. ओवसा कार्यक्रमाच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. रात्रीच्या वेळी टाळ आणि तबल्यांच्या गजरात धरलेला भजनाचा ठेका आणि गौरी विसर्जन च्या दिवशी माता भगिनींनी मांडलेला झिम्मा फुगडीचा डाव खूपच सुंदर. सालाबादप्रमाणे ओवसा कार्यक्रमाचे औचित्य साधून केला जाणारा महाप्रसाद त्यातील मिक्स भाजी तांदळाची खीर याचा आस्वाद याचे विस्मरण होणेही शक्य नाही आणि शेवटी गणपती बाप्पांचे विसर्जन म्हणजे संपूर्ण गावाच्या एकीचे प्रदर्शनच जणू! ताशाच्या आवाजात आणि फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये गावातील एकामागून एक असे एकत्र गणेश विसर्जन हा ही अद्भुत परंपरा आणि भाभडी भक्तीअसा सुंदर आणि अद्भुत सोहळा निरंतरपणे व अखंडितपणे सुरू राहो व ही शक्ती गणपती बाप्पा आम्हाला देवो ही गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना धन्यवाद.

कार्तिक गुरुनाथ देसाई

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते