खानापूर

आलेहोळ येथे शेतकऱ्याने बिबट्याचा थरारक व्हिडिओ टिपला!

खानापूर: आलेहोळ येथे शनिवारी रात्री परशराम पाटील या शेतकऱ्याने झुडपात बसलेल्या बिबट्याचा थरारक अनुभव घेतला. शेतात काम आटोपून परतत असताना झुडपातून काहीतरी हालचाल होत असल्याचे त्याच्या लक्षात आले. धाडस दाखवत त्याने बॅटरीचा प्रकाश टाकला आणि थेट बिबटा त्याच्या नजरेस पडला!

बिबट्याला पाहून क्षणभर घाबरलेल्या शेतकऱ्याने धीर ठेवत मोबाइलद्वारे बिबट्याचा थरारक व्हिडिओ टिपण्यात यश मिळवले. सदर व्हिडिओ सध्या परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरला आहे.

गेल्या काही दिवसांपासून हडलगा आणि आलेहोळ परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने जाणवत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांना फस्त केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

“हेस्कॉमने वीज पुरवठा सुरू ठेवावा” अशी मागणी
रात्रीच्या वेळेस शेती परिसरात वीज पुरवठा खंडित होतो, त्यामुळे बिबट्यासारख्या जंगली प्राण्यांचा धोका अधिक वाढतो आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी सायंकाळी सहा नंतर सिंगल फेज वीज पुरवठा सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. “हिंस्त्र प्राण्यांपासून नागरिकांना धोका झाल्यास हेस्कॉम जबाबदार राहील,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

At Allehol (Taluka Khanapur), on Saturday night, a farmer had a thrilling encounter with a leopard sitting in the bushes. While returning home after finishing his farm work, he noticed some movement in the bushes. Showing courage, he shone a flashlight and came face-to-face with the leopard!


whatsapp


Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते